मुख्य बातम्या

अखेर टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी कमिटी दाखल, चौकशी कमिटी निपक्षपणे कारवाई करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे उपचाराअभावी अपघातातील, गरोदर स्त्रीया, नवजात बालके यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेट भागातील तब्बल नऊ गावांच्या ग्रामपंचायतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार रोहित पवार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे धाव घेतली. तसेच, माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी ही सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्याप पर्यत कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

आज ( दि. ११ )रोजी अखेर या प्रकरणी जिल्हा चौकशी समितीने टाकळी हाजी येथे दाखल झाली. जिल्हा उपआरोग्य अधिकारी डॉ. सचिन येडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ग्रामस्थ व नऊ गावातील नागरिकांची मते जाणून घेतली. त्यावर आधारित अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे चौकशी समिती वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करणार ? की संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे वडील उच्च पदस्थ अधिकारी असल्याने त्यांच्या दबावाखाली काम करत कागदपत्रे रंगवणार ? याकडे बेट भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.पंधरा दिवसात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास टाकळी हाजी आरोग्य केंद्रा केंद्रापुढे आमरण उपोषणास बसणार असल्याचे ९ गावातील पदाधिकार्यांनी सांगितले आहे.

यावेळी उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन येडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश कट्टीमनी, विस्तार अधिकारी संभाजी घोडे, तालुका पर्यवेक्षक संभाजी कोकडे, टाकळी हाजी च्या सरपंच अरूणा घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, वडनेर चे उपसरपंच अनिल वाजे, सदस्य विक्रम निचित, विश्वनाथ निचित, हरिभाऊ शेलार, नवनाथ निचित, रामदास कोळेकर, संदीप भाकरे, लहू गावडे, सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे, शांताराम पानमंद, योगेश वाळुंज, वैभव शेलार, जालिंदर राळे ,परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ग्रामस्थांकडून मिळालेली सर्व माहिती व जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पाहणी या अनुषंगाने चौकशी समितीमार्फत सविस्तर अहवाल माझ्याकडे येईल. त्या अहवालानुसार योग्य ती तात्काळ कारवाई करण्यात येईल.

डॉ. रामचंद्र हंकारे 

नवनिर्वाचित, जिल्हा आरोग्य अधिकारी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago