शिरूर (अरुणकुमार मोटे): हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन यांच्या वतीने शिरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर आणि मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथे हे शिबिर पार पडणार आहे. गरजूंना मोफत चश्म्यांचे वाटप देखील या शिबिरात केले जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ शेख यांनी दिली. उपाध्यक्ष हाजी फारूक बागवान, सचिव हाजी मुस्ताक शेख, सदस्य हाजी फिरोज बागवान, हाजी आबिद शेख आदी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी, बालरोग, हाडांचे आजार, ई.सी.जी., मधुमेह, उच्च रक्तदाब, दंतरोग, त्वचारोग आणि स्त्रीरोग तपासणी केली जाणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, आनंदऋषिजी नेत्रालय अहिल्यानगर, मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल आणि रुबी हॉल क्लिनीक, शिरूर यांचे या शिबिरासाठी सहकार्य मिळणार आहे.
शिबिराचे उद्घाटन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, खासदार अमोल कोल्हे, आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अशोक पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…