मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनीला आग लागल्याने पाच कोटी पेक्षा जास्त नुकसान…

शेजारील विद्युत रोहित्रावर चारचाकी धडकल्याने घडली घटना..

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरुर -चौफुला महामार्गारील न्हावरा येथिल घोडगंगा साखर कारखान्याशेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी कार धडकून झालेल्या अपघातात रोहित्र खाली कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनी जळून खाक झाली असून यात कंपनीतील मशनरी, कच्चा माल फर्निचर व इतर साहित्य मिळून पाच कोटी पेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत गुलाब पोपट पडवळ (वय 40), रा. बोरीपार्धी (आनंद हेरीटेज) ता. दौड, जि. पुणे) यांनी खबर दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाब पडवळ यांची मालकीची प्लास्टिक कंपनी न्हावरे येथे असून दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिरुर चौफुला महामार्गावर न्हावरा (ता. शिरूर) घोडगंगा साखर कारखाना शेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. 12 यु.एस. 1994 कंपनी बाहेर असलेल्या विद्युत रोहित्राला धडकली. यामुळे रोहित्र खाली पडले व शॉर्टसर्किट झाले. यामुळे शेजारील त्रिमूर्ती प्लास्टीक कंपनीतही शॉर्टसर्किट झाले व आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला व धूर निघू लागला पाहता पाहता संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली.

कंपनीचे मालक गुलाब पडवळ व मॅनेजर योगेश आरोटे त्या ठिकाणी आले त्यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील व शिरूर नगर परिषद अग्निशमन दलाला बोलावले बाजूला असणाऱ्या बांधकामावरील पाण्याचे टँकर बोलवून घेतले. तब्बल साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत कंपनीमधील पाच कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या मशनरी कच्चामाल जळून खाक झाला. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे जळीताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन बी जाधव करीत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

16 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

19 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

21 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago