ramdas-thite
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बौद्धिक क्षमतेइतकेच शारीरिक सदृढतेलाही महत्त्व आहे. ध्येयपूर्तीसाठी सातत्य, समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या मूल्यांची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या शिक्रापूर शाखेच्या वतीने आयोजित शाखा सभासद पाल्य गुणगौरव समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात शिरूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. पाटील म्हणाले की, राज्यात सुमारे सात हजार सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्या तुलनेत सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी, मुंबई ही संस्था शिक्षकांच्या सर्वसामान्य गरजा जोपासण्यासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेने आजपर्यंत ३३ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असून शिक्रापूर शाखेतील तीन सभासदांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ३३ लाख रुपयांची कर्जमाफी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशा प्रकारची कार्यपद्धती सहकार क्षेत्रातील आदर्श उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी शिरूर तालुका प्राध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी शिरूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, शिरूर तालुका म्हणजे गुणवत्तेची अग्रणी पायाभरणी आहे. विद्यार्थ्यांचे यश हे प्रयत्न, पात्रता, परिस्थिती, सातत्य आणि वेळेचे नियोजन यांचा एकत्रित परिणाम असतो. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य असून सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी हे कार्य सातत्याने पार पाडत आहे.
त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेत शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.४९ टक्के, तर दहावीचा निकाल ९५.७९ टक्के लागला आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांमधील प्रशासकीय अधिकारी घडविण्याची परंपरा, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांमधील यश तसेच राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तालुक्यातील विद्यार्थी सातत्याने चमकत असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक गुणवत्तेचा असा आनंदोत्सव प्रत्येक गावात साजरा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. चंद्रकांत पाटील यांना प्राप्त झालेल्या सहकार समाजसेवा पुरस्कारानिमित्त शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, खजिनदार सतेज शिंदे, सहसचिव सतीश माने, संचालक सचिन नलावडे, प्रमोद देशमुख, जगन्नाथ जाधव, राज्य आश्रमशाळा महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. तुकाराम शिरसाट, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम, शाखा व्यवस्थापक शांताराम विरकर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब चव्हाण, सहसचिव अशोकराव दहिफळे, उपाध्यक्ष रामनाथ इथापे, विद्या सचिव संतोष दौंडकर, मुख्याध्यापक मोहन दरेकर, शिरूर-हवेली शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र थिटे, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गवारी यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्रापूर शाखेचे पालक संचालक प्राचार्य तुकाराम बेनके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तज्ञ संचालक गुलाबराव गवळे यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश चव्हाण यांनी केले.
प्राचार्य रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान…
योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे
प्राचार्य रामदास थिटे यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार!
व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे
चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…