शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सहकार विभागाच्या सहायक निबंधक पदावर हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज (दि.१८) शिरूर येथील कार्यालयात पदभार स्वीकारला.
गेल्या तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. दोन महिन्यांपूर्वी दौंडचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान शिरूरचे सहायक निबंधक अरुण साकोरे यांची पदोन्नती होऊन बदली झाल्याने पद रिक्त झाले होते.
हरिश्चंद्र कांबळे हे अनुभवी अधिकारी असून याआधी त्यांनी राजगुरुनगर, उस्मानाबाद तसेच अहिल्यानगर येथे सहायक निबंधक म्हणून कार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा व्यापक अनुभव शिरूर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या प्रगतीस नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आज (दि. १८) कांबळे यांनी शिरूर येथील कार्यालयात देविदास मिसाळ यांच्याकडून सहायक निबंधक पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी सहकार विभागातील सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत व सत्कार करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी सहकार विभागातील अधिकारी दीपक वराळ, पोपट हराळ, प्रशांत पिसाळ, आप्पासाहेब धायगुडे, काजल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. कांबळे यांच्या आगमनाने शिरूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विविध प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून सहकारी संस्थांना अधिक कार्यक्षम मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…