मुख्य बातम्या

शिरुर शहरात गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी लवकरच बैठक; प्रशांत ढोले

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी गणेश उत्सव व पैगंबर जयंती मिरवणुक डीजे मुक्त करायचे असतील तर गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी पुढाकार घेऊन डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करुया. परंतु डीजे वाजला तर डीजे जप्त करुन कडक कार्यवाही केली जाईल असा इशारा शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिला असुन हे उत्सव सामाजिक सलोखा ठेवुन साजरे करावे असे आवाहनही केले आले.

तसेच शिरुर शहरात डीजे मुक्त गणेशोत्सव करण्यासाठी लवकरच गणेश मंडळ व स्थानिक नागरिक यांची बैठक घेणार असल्याचेही ढोले यांनी सांगितले. शिरुर येथील तहसील कार्यालयात गणेशोत्सव व पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) च्या अनुषंगाने शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटी, गणेश मंडळ, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, पत्रकार, यांची बैठक बोलावली होती यावेळेस उपविभागीय अधिकारी ढोले बोलत होते.

यावेळी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे, माधव सेनेचे रवींद्र सानप, महिला दक्षता कमिटीच्या जिल्हा सदस्य शोभना पाचंगे, माजी नगरसेवक अबिद शेख, आप पक्षाचे अनिल डांगे, प्राध्यापक ईश्वर पवार, प्राध्यापक विलास आंबेकर, ॲड किरण आंबेकर, शशिकला काळे, डॉ वैशाली साखरे, हाफीज बागवान, राहील शेख, सविता बोरुडे, संदीप कर्डीले, उमेश शेळके, शिरुर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक डी बी बर्गे , निलेश जाधव तसेच मोठ्या प्रमाणात शहरातील हिंदु-मुस्लिम नागरिक उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना ढोले म्हणाले, गणेश उत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही सण आपल्या सर्वांच्या अस्मितेचे आहे. यासाठी शहरामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांबरोबर गणेश मंडळ, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यामुळे गणेशोत्सव व पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असुन यासाठी सर्वांनीच कायदा सुव्यवस्था व सामाजिक बांधिलकी राखावी असे आवाहनही ढोले यांनी केले आहे.

 

तर गणेश मंडळांनी आपल्या मंडपामध्ये सीसीटीव्ही लावल्यास कुठलाही अनुचित प्रकार घडण्या अगोदर आपल्याला माहिती मिळेल किंवा कोणी केले हि माहिती कळेल. त्यामुळे सत्य समोर येण्यास व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे. तसेच शाळा व कॉलेज यामध्ये मोठ्या प्रमाणात शालेय मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत शाळेच्या तक्रार पेटीमध्ये तक्रार टाकावी. त्यात संबंधित व्यक्तीचे नावही लिहावे असे केल्यास संबंधित व्यक्तीवर शाळा कॉलेजच्या मदतीने कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी शाळांनी मुलांमध्येही प्रबोधन करणे गरजेचे आहे असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे संदेश केंजळे यांनी केले आहे.

 

तसेच येणारा गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव सण आपण सर्वांनी एकत्रित व शिरूर शहरातील जातीय सलोख्याची परंपरा कायम ठेवून साजरे करुया असे आवाहनही पोलीस निरीक्षक केंजळे यांनी केले.

यावेळी शिरुर शहरातील नागरिकांनी मुलींची छेडछाड, गणेशोत्सव काळात डीजेच्या आवाजामुळे होणारा त्रास, अल्पवयीन मुलांकडुन शिरुर शहरात वाकडीतिकडी वाहन चालविल्याने होणारा त्रास, शिरुर शहरातील गल्लोगल्ली रस्ता अडवुन गाड्यांवर वाढदिवसाचा केक कापणे सुरु असुन हे गैरप्रकार बंद करावे, तसेच बाबुरावनगर रस्त्यावर काही तरुणांकडे धारदार शस्त्र आहेत अशा अनेक तक्रारी यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरीकांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले तसेच पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्याकडे केल्या आहेत.

शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांची शिक्षिकेला अनोखी भेट, शिक्षिकेला भेट म्हणुन दिली चक्क सोन्याची अंगठी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago