मुख्य बातम्या

शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांची शिक्षिकेला अनोखी भेट, शिक्षिकेला भेट म्हणुन दिली चक्क सोन्याची अंगठी

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आशा गणेश पवार (शिंदे) यांना शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी चक्क सोन्याची आणि मानचिन्ह देवून सन्मानित केले आहे. पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२३/२४) मध्ये या शिक्षिकेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील राज्य गुणवत्ता यादीत दोन व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये सात असे एकूण ९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते.

 

सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्गशिक्षिका आशा गणेश पवार (शिंदे) यांनी बहुमोल मार्गदर्शन केले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या आदर्श शिक्षकेला भेटवस्तू म्हणून एक सुवर्ण अंगठी व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांच्या वतीने सुद्धा सन्मानचिन्ह व संपुर्ण पोशाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यामुळे कवठे येमाई परिसरात या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत असुन या पुढील काळात शाळेची अशीच प्रगती होत राहो अशी अपेक्षा पालकांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष डॉक्टर आरती उचाळे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भाऊसाहेब घोडे, नितीन मुखेकर, नवनाथ शिंदे ,विलास सालकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शांताराम पोकळे यांनी तर आभार शैला इचके यांनी मानले.

 

पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२३/२४) मध्ये यश संपादन केलेले विदयार्थी पुढीलप्रमाणे
१) स्वरा विलास सालकर २७६ (राज्य गुणवत्ता यादीत)
२) देवदत्त अजित सरोदे २७४ (राज्य गुणवत्ता यादीत)
३) आदिती गणेश पवार (२६०)
४) समृद्धी संतोष उचाळे (२५२)
५) संस्कृती भाऊ घोडे (२४८)
६) राधिका मच्छिंद्र पुंडे (२४६)
७) राजेश्वरी नवनाथ शिंदे (२३८)
८) वैष्णवी नवनाथ वागदरे (२३८)
९)मानवी नितीन मुखेकर (२३६)

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिरुर तालुका कुस्ती स्पर्धेत मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेचे निर्विवाद वर्चस्व

शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

6 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago