suresh palande
न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला आहे, असा आरोप अॅड सुरेश पलांडे यांनी आलेगाव पागा येथे केला.
घोडगंगा सहकारी कारखान्यानंतर चार वर्षांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरु झाला. सन 2018-19 साली घोडगंगा कारखान्याला एक पोत साखर तयार करण्यासाठी 1564 तर भिमाशंकर साखर कारखान्याला 706 रुपये खर्च आला. अडीच वर्षांपुर्वी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर घोडगंगाला एक पोत साखर तयार करण्यासाठी 2240 तर भिमाशंकरला 757 खर्च आला. त्यामुळे आपल्या शेजारील कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याला एका पोत्याला सुमारे 1500 रुपये खर्च जास्त कसा येतो? असा सवाल अॅड सुरेश पलांडे यांनी उपस्थित केला.
घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला असल्याचा आरोपही पलांडे यांनी केला.
दादापाटील फराटे म्हणाले, ‘आमदार अशोक पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या विकासाबाबत बोलण्याऐवजी इतर मुद्यावर बोलतात. परंतु, सभासद शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी हि निवडणूक हातात घेतली आहे. आम्ही गेले अडीच वर्ष शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना वाचावा म्हणून संघर्ष करत आहोत. त्यामुळे आमच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनलला साथ द्या, असे आवाहन दादापाटील फराटे यांनी शेतकऱ्यांना केले.’
Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे
खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…