मुख्य बातम्या

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील एका मुलीला तिचे नग्न फोटो काढून ते फोटो मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ओमकार राजाराम चव्हाण (रा.निर्माण प्लाझा, शिरुर) या युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२२ ते 9 जुन 2023 या कालावधीत ओमकार चव्हाण याने त्याचे राहत्या घरी एका अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावुन तिचे नग्न फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढून घेतले. तसेच सदरचे फोटो मी व्हायरल करीन, अशी धमकी देवुन वारंवार तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मित्राच्या घरी (नाव माहीत नाही) गुजरमळा, शिरुर येथे तसेच ओमकार याच्या निर्माण प्लाझा, शिरूर येथील राहत्या घरी वेळोवेळी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.

त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने त्यास पुन्हा भेटायला नकार दिला असता. ओमकार याने तिला तिच्या घरामध्ये येवुन मला भेटायला ये, माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुला उचलून नेईन, तुझे अख्खे खानदान संपवेन, मी फाशी घेईन, अशी धमकी दिली आहे, म्हणुन सदर युवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनच्या महीला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले ह्या करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago