वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना थांबलेल्या असताना आता पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ सुरु झाला असून नुकतेच बिबट्याने एका मेंढीचा फडशा पाडला असल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील खर्डे वस्ती येथे तान्हाजी खर्डे यांच्या शेतात धुलाशंकर चोरमले व काळूराम चोरमले हे मेंढपाळ बसलेले असून रात्रीच्या सुमारास मेंढ्या ओरडण्याचा आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने चोरमले जागे झाले असता एक बिबट्या मेंढी ओढत घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या मेंढी जागेवर सोडून पळून गेला. मात्र मेंढी ठार झाली.
याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनरक्षक ऋषिकेश लाड व वनमंजूर हनुमंत कारकुड यांच्या माध्यमातून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने सदर ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी पोलीस पाटील कमलेश शिर्के यांनी केली, तर याबाबत बोलताना सदर ठिकाणी पाहणी करुन पुढील कार्यवाही केली जाईल असे वनरक्षक ऋषिकेश लाड यांनी सांगितले.
मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने…
चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील…
नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि…
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…