मुख्य बातम्या

त्या माजी उपसरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची केली जमीन खरेदीत फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू उर्फ बबन ढोकले यांनी एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन खरेदी करुन काही जमीन विक्री करुन देखील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे लाखो रुपये न देता फसवणूक केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी उपसरपंच बबलू उर्फ बबन सोमनाथ ढोकले याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांची जमीन असून त्यांनी सदर जमिनीपैकी काही जमीन करंदीचे माजी उपसरपंच बबन ढोकले यांना २०२० मध्ये विक्री केली होती. त्यावेळी ढोकले याने तनपुरे यांना थोडे पैसे देऊन चौदा लाख रुपये नंतर देतो असे सांगितले होते.

दरम्यान ढोकले याने सदर जमिनीपैकी काही जमीन अन्य लोकांना विक्री केली. मात्र तनपुरे यांनी वारंवार पैशाची मागणी करुन सुद्धा ढोकले याने त्यांना पैसे दिले नाही. तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे आपली जमीन विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे (वय ६९) रा. कुणाल पार्क सोसायटी सुभाषनगर धानोरी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी करंदीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू उर्फ बबन सोमनाथ ढोकले यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

5 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

10 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago