मुख्य बातम्या

शिरूरमध्ये गट सचिवांचा स्नेहमेळावा; सेवानिवृत्तांचा गौरव

शिरूर (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील गट सचिवांची बैठक, स्नेहभोजन व सेवानिवृत्त गट सचिवांचा सत्कार समारंभ नुकताच गुरुकृपा हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला तालुक्यातील गट सचिव, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे उपनिबंधक मा. अरुणरावजी साकोरे होते. यावेळी सेवानिवृत्त गट सचिव दिगंबर लोणकर, महादेव थोरात, संभाजी दोंडे आणि विजय मोकाशी यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्यासाठी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.अशोक (बापू) पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गट सचिवांना पगारवाढ व पगारातील फरक मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या मोलाच्या प्रयत्नांबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली.

बैठकीत गट सचिवांच्या विविध प्रशासकीय, संघटनात्मक व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिरूर तालुक्यातील गट सचिवांनी केले होते.यावेळी बोलताना सचिव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी, “अशा स्नेहमेळाव्यांमुळे गट सचिवांमधील संवाद, स्नेह आणि एकोपा अधिक दृढ होतो. तसेच अनुभवी सहकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी मिळते,” असे सांगितले.

“गट सचिव हे सहकार चळवळीचा कणा असून शेतकरी, सभासद आणि सहकारी संस्थांमधील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्या न्याय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी यापूर्वीही प्रयत्न केले असून, भविष्यातही आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य कायम राहील. गट सचिवांचे हित जपण्यासाठी आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू,

अशोक बाप्पू पवार (मा. आमदार तथा पुणे जिल्हा बँक संचालक पुणे)

“गट सचिवांमधील एकोपा, समन्वय आणि संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी अशा स्नेहमेळाव्यांचे विशेष महत्त्व आहे. संघटनेच्या माध्यमातून गट सचिवांचे विविध प्रलंबित प्रश्न शासन व संबंधित विभागाकडे सातत्याने मांडले जातील. सर्व गट सचिवांनी एकजुटीने काम करून सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.

राजेंद्र पवार (अध्यक्ष सचिव संघटना शिरूर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का

च्यवनप्राश एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे. ज्याचे शतकानुशतके भारतीय घरांमध्ये सेवन केले जात आहे. हा…

4 तास ago

‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते…

4 तास ago

२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा…

4 तास ago

आंबेडकर उद्यानाच्या वाढीव जागेऐवजी उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी; नोवेल साळवेंचे आवाहन

कल्याण : कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या…

5 तास ago

बळीराजा, महिला आणि तरुणांसाठी महायुती सरकार कटिबद्ध; कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या…

18 तास ago

घाटकोपरच्या रामजीनगरातील तुंबलेल्या शौचालयांवरून महापालिकेला धारेवर; महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या…

21 तास ago