शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील व्यंकटेश्वरा रिसर्च ब्रोडिंग फार्ममध्ये ट्रान्सफॉर्मरच्या अर्थिंगच्या १२५ किलो तांब्याच्या पट्ट्यांची चोरी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमोणे येथील व्यंकटेश्वरा रिसर्च ब्रोडिंग फार्ममध्ये अज्ञात चोरट्यांनी तारेचे कंपाउंड तोडून प्रवेश करत विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या अर्थिंगसाठी बसविण्यात आलेल्या सुमारे १२५ किलो वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीस गेलेल्या तांब्याच्या पट्ट्यांची किंमत सुमारे ६२ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत येथील सुरक्षा रक्षक तेजप्रताप मोहन यादव (वय ३८, सध्या रा. व्यंकटेश्वरा रिसर्च ब्रोडिंग फार्म, निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि ८ जुलै २०२६ रोजी रात्री ११ ते गुरुवार दि ९ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या कालावधीत हि चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी निमोणे गावच्या हद्दीतील व्यंकटेश्वरा रिसर्च ब्रोडिंग फार्मच्या दक्षिण बाजूला असलेले तारेचे कंपाउंड तोडले. त्यानंतर फार्मच्या परिसरात अनधिकृतपणे प्रवेश करुन विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या अर्थिंगसाठी बसविण्यात आलेल्या हिरव्या रंगाच्या कोटिंग असलेल्या तांब्याच्या पट्ट्या चोरुन नेल्या.

चोरीस गेलेल्या तांब्याच्या पट्ट्यांचे वजन सुमारे १२५ किलो आहे. जुन्या वापरातील तांब्याचा दर प्रतिकिलो ५०० रुपये याप्रमाणे या मुद्देमालाची एकूण किंमत ६२ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. सुरक्षा रक्षक तेजप्रताप यादव यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली. कंपनीच्या दक्षिण बाजूचे तारेचे कंपाउंड तोडल्याचे तसेच ट्रान्सफॉर्मरच्या अर्थिंगच्या तांब्याच्या पट्ट्या गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

शिरुरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार विनोद मोरे हे करत आहेत. दरम्यान, शिरुर तालुक्यातील कंपन्या, शेतवस्ती आणि निर्जन परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील तांबे चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल तातडीने हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

4 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago