मुख्य बातम्या

मुरुम वाहतुक करणाऱ्या हायवा ट्रकने तलाठ्याला जोरदार धडक देवून केला जीवे मारण्याचा प्रयत्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारवाई करणाऱ्यासाठी गेलेल्या एका तलाठ्याच्या कारला मुरुम वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या चालकाने जोरदार धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात तलाठयाच्या गाडीने तीन पलट्या घेतल्या असून एअरबॅग ओपन झाल्याने जबर मार लागून तलाठी मात्र मोठया संकटातून बचावले आहे.

सध्या ते शिरुर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी तलाठ्याने अज्ञात चालक व इतर दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न व विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, शिरुर तालुक्यामध्ये होत असलेल्या अनाधिकृत गौण उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी शिरुर तहसिल कार्यालयामार्फत पथक निर्मीत केलेबाबत आदेष निर्गमीत केले असुन पथकामध्ये दिपक गांगर्डे तलाठी मांडवगण फराटा, पथक प्रमुख मनिषा खैरे मंडल अधिकारी न्हावरा, डी.बी. चौधरी तलाठी ऊरळगाव, एम.बी. आगवणे तलाठी रांजणगाव सांडस, तसेच दुसरे पथक प्रमुख एस.पी. साळवे मंडल अधिकारी वडगाव रासाई त्यांचे सोबत डी. जे. मोरे तलाठी इनामगाव, वाय. एम. टीळेकर तलाठी शिरसगाव काटा असे सदर पथकामध्ये नेमणूक करण्यात आलेली होती.

(दि. ११) जानेवारी रोजी रात्री ११ वाजणेचे सुमारास वरील दोन्ही पथके व स्टाफ असे शिरुर तालुक्यामध्ये होत असलेल्या अनाधिकृत गौण उत्खनन व वाहतुक कार्यवाहीकरीता न्हावरा ते तळेगाव ढमढेरे रोडने पथक खाजगी वाहनाने फिरत असताना त्यांना मौजे दहीवडी गावचे हद्दीत मुरुमाची वाहतुक करीत असणारा हायवा के. एम.एच.12 यू.एम.0004 हा तळेगाव ढमढेरे बाजूकडे जाताना दिसला त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील खाजगी वाहनाने त्या हायवा ट्रकचा पाठलाग कruन शासकीय धान्य गोदाम तळेगाव ढमढेरेचे गेटजवळ हायवा ट्रक थांबवुन त्यावरील ड्रायव्हर यास पथकाने आम्ही शिरुर महसुल विभागाचे कर्मचारी आहे, असे सांगितले तेव्हा त्यास गाडीत काय आहे, असे विचारले असता त्याने गाडीत मुरुम आहे असे सांगितले. तेव्हा पथकातील तलाठी टिळेकर यांनी हायवाचे वर चढून पाठीमागे हौदयात पाहणी केली असता हौदयात अंदाजे ६ ब्रास मुरुम असल्याचे निदर्शनात आले.

चालकाला तुमच्याकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना आहे काय? अशी विचारणा केली असता सदर ड्रायव्हरने परवाना नसल्याचे सांगितले तेंव्हा पथकाने त्यास हायवा ट्रक शासकीय गोदामात लावण्यास सांगितले असता त्याने हायवा ट्रकचे केबीनचा दरवाजा आतून लॉक करुन घेतला. व दोन्ही बाजूच्या काचा बंद केल्या. व हायवा गाडी चालूच ठेवली होती. ड्रायव्हरचे सोबत केबीनमध्ये इतर दोन इसम बसलेले होते. पथकाने सदर ड्रायव्हर यास केबीनचा दरवाजा उघडण्याबाबत सांगितले असता चालकाने मी ट्रक मालकाला फोन करतो असे म्हणुन कोणाचीतरी साधारण १० मिनीटे फोनवर बोलत होता. तेव्हा रात्री ११ : ३० वाजता पथक प्रमुख खैरे मॅडम यांना सदर मुरुम वाहतुकीबाबत खात्री झालेने घटनास्थळावरुन त्यांनी तहसिलदार प्रशांत पिसाळ यांना फोनवरुन हकीगत सांगून पोलीस मदत पाठविणेबाबत सांगितले होते.

तेव्हा फिर्यादी व इतर महसुल स्टाफ हा ट्रकचे समोर आले असताना ट्रक ड्रायव्हरने त्याचा फोन ठेवून ट्रकमध्ये त्याच्या दोन साथीदारांची बोलत होता. त्याचे दोन साथीदार हे हाताने पुढे जाण्यचा इशारा करुन तोंडाने काहीतरी बोलत होते. तेव्हा ट्रक ट्रायव्हर याने ट्रकचे समोर उभे असलेल्या पथकाचा स्टाफचे अंगावर हायवा ट्रक रेस करुन घेवून लागला. सर्व स्टाफ लागलीच हायवा ट्रकचे समोरुन जीव वाचविण्याकरीता बाजूला झाले. त्यावेळी हायवा ट्रकच्य ड्रायव्हरने तळेगाव ते आष्टापुर रोडने आष्टापुर बाजूकडे भरधाव वेगात चालवित घेवून जात होता म्हणुन पथकाने त्यांच्याकडील खाजगी वाहनाने सदर हायवा ट्रकचा पाठलाग करण्यास सुरूवात केली.

साधारण एक ते दीड किलोमीटर पाठलाग करुन तलाठी गांगर्डे हे चालवित असलेली टाटा टीगर गाडी नंबर एम. एच. 16 सी. वाय. 8833 ही सदर हायवा ट्रकचे उजवे बाजूने ओव्हरटेक करण्याकरीता लाईटने तसेच हॉर्न वाजवून इशारा दिला असता ट्रक डायव्हरने त्याचे ताब्यातील हायवा ट्रक ही डावे बाजूस घेतली व तलाठ्याला पुढे जाण्याकरीता साईड दिली. तेव्हा तलाठ्याने गाडी ही ट्रकचे उजवे बाजूने पुढे घेवुन जात असताना ट्रक ड्रायव्हरने त्याचे ताब्यातील हायवा ट्रक उजवे बाजूस घेवुन तलाठयाच्या गाडीच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या दरवाजास जोरदार ठोस दिली.

ठोस दिल्यानंतर तलाठ्याची गाडी रोडवरून खाली उतरून शेजारी असलेल्या शेतात तीन पल्टी घेवुन चक्काचूर सरळ झाली. त्यावेळी गाडीच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या गेल्या. या तसेच गाडीच्या डाव्या बाजूची मागच्या दरवाजाची काच फुटली. सदर हायवा ट्रकवरील चालकाने सदरचा ट्रक हा तसाच पुढे घेवुन गेला. तेंव्हा साधारण रात्रीचे ११ : ४५ वाजले होते. त्यानंतर सदर ठिकाणी इतर सहकारी हे त्यांचे गाडीसह तिथे आले व त्यांनी तलाठी यांना गाडीतून बाहेर काढले आहे. त्यावेळी हायवाच्या पाठीमागे पथक गेले असता हायवा ट्रक ड्रायव्हरने त्याचे हायवा ट्रकमधील मुरुम रस्त्यात टाकून करून अडथळा केल्याचे दिसून आले.

म्हणुन फिर्यादी तलाठी दिपक गांगर्डे यांची टाटा टीगॉर गाडी नंबर एम. एच. 16 सी. वाय. 8833 हिचे डावे बाजूस ठोस देवुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन ते करीत असलेल्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करून, मुरुमाने भरलेला हायवा ट्रक घेवुन पळुन जावुन रस्त्यात मुरूम टाकुन अडथळा केला म्हणुन त्यांनी हायवा ट्रक नंबर एम.एच. १२.यु.एम.०००४ याच्या चालक व इतर दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिरुर तालुक्यामधील अनेक गावांमध्ये गौण खनिज उपसा व वाहतुक सुरू असताना तेथील तलाठी, मंडल आधिकारी, कोतवाल, पोलिस पाटील, बीट अंमलदार नेमकी काय करतात?यांच्यावरच कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत शिरुर तालुक्यातील सुजाण नागरीकांनी व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

14 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago