शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील मंगल फडके यांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार

शिरुर (किरण पिंगळे) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व मानव विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांच्या मातोश्री मंगल फडके यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व मानव विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, रामलिंग महिला उन्नतीच्या अध्यक्षा राणी कर्डीले, मानव विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

रामलिंग येथील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यकम घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिजाऊ जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा करत त्यांचे विचार व्यक्त केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील आणि मानव विकास परिषदेचे संदीप कुटे या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणुन शालेय साहित्य देण्यात आले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलिस अंमलदार शंकर चव्हाण, महिला समुपदेशक योगिता गुंड, जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे, नगरसेविका मनीषा कालेवार, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड रविंद्र खांडरे, मानव विकास परिषदचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, कायदे सल्लागार मीना गवारे, महीला जिल्हा मार्गदर्शक शशिकला काळे, ह भ प रामदास महाराज फडके, डॉ वैशाली साखरे, पत्रकार किरण पिंगळे, शिवसेनेच्या विजया टेमगिरे, वैशाली बांगर, विभावरी देव, सुवर्णा सोनवणे, दिपाली आंबरे, श्रुतिका झांबरे, नीलम क्षीरसागर, साधना हजारे, शीतल शर्मा, सीमा कारकुड, नंदा गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी शिर्के तसेच शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षिका मांजरे यांनी तर आभार रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थेच्या अध्यक्षा सरचिटणीस राणी कर्डिले यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

5 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago