मुख्य बातम्या

पुण्यात मातंग नवनिर्माण सेनेचे आजपासुन हलगीनाद आंदोलन

शिरुर (तेजस फडके) पाषाण येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शुक्रवार (दि 23) पासुन मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन व यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांच्या तक्रारी संदर्भात न्याय मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आलेले असुन रांजणगाव औद्योगिक वसाहतीत MEPL कंपनीने केमिकल युक्त अति प्रदूषित पाणी मातंग समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या दिशेने सोडलेले आहे. त्यामुळे शेती पुर्णपणे नापिक झालेली आहे. विहिरीचे पाणी तसेच इतर जलस्त्रोत प्रचंड दूषित झालेले असल्याने मानसेच्या वतीने आंदोलन करण्यात येत असुन आज (दि 27) पासुन अनोखे आंदोलन करण्यात येणार असुन पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर हलगीनाद करण्यात येणार असल्याचे मातंग नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव लक्ष्मण मांढरे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना दिली.

यावेळी बोलताना मांढरे पुढे म्हणाले, आम्ही पुणे तसेच रांजणगाव MIDC कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रांजणगाव पोलीस स्टेशन आदी ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार केला असतानाही आमच्या निवेदनाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे MEPL कंपनी आणि त्या कंपनी व्यवस्थापनाला पाठीशी घालणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर तात्काळ अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या Deccan industrial Explosives Pvt Ltd या दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीच्या आत मध्ये मातंग समाजाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. सदर प्रकरण कंपनी प्रशासन, स्थानिक पुढारी व पोलिसांनी परस्पररीत्या दडपले असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

तसेच रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षिततेच्या अभावी दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल झालेला नाही तरी तात्काळ पोलीस प्रशासनाने या प्रकरणी 304 (A) प्रमाणे तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. वारंवार निवेदन देऊनही जाणीवपुर्वक मातंग समाजाच्या निवेदनाची दखल न घेता. तसेच ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जाणून बुजून क्रॉस कंप्लेंट घेऊन ॲट्रॉसिटी कायदा व घडलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याला कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या यवत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाची सविस्तर चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. अद्यापपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयाने वरील तक्रारी संदर्भात दखल न घेतल्याने आज (दि 27) पासुन भव्य हलगीनाद आंदोलन केले जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते.…

7 तास ago

ऍलर्जीक खोकला लक्षणे व त्यावरील उपाय

ऍलर्जीक खोकला ही अत्यंत थकवा आणणारी स्थिती आहे. घशात जळजळ होते, रात्री वाढते आणि दैनंदिन…

7 तास ago

भारतीयांमध्ये का वाढतंय, हृदयाच्या आजारांचं प्रमान

भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही…

7 तास ago

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

21 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

21 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

21 तास ago