मुख्य बातम्या

कोणताही पदाधिकारी दबाव टाकत असेल तर अधिकाऱ्यांनी पुढे यावे; आबासाहेब सोनवणे

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता काम करावे तसेच जर शिरुर तालुक्यातील कोणी भाजपाचा पदाधिकारीअधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देत असतील तर अधिकाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे शिरुर तालुका भाजपाचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

“शिरुर तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांकडुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरल जातंय वेठीस” अशा आशयचे वृत्त “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सोनवणे म्हणाले, भाजपा हा पक्ष शिस्त पाळणारा पक्ष असुन जर कोणी पदाधिकारी असा गैरप्रकार करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली काम करु नये. तसेच अधिकाऱ्यांनी कोणताही भाजपाचा पदाधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर पुराव्यासहित त्याची तक्रार माझ्याकडे करावी असेही त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवसेना पक्षफुटी प्रकरणात सिब्बलांचा दोन सवालांनी शिंदे गटाची कोंडी?

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटी आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे…

31 मिनिटे ago

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा हप्ता लवकरच खात्यात; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत…

38 मिनिटे ago

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून…

44 मिनिटे ago

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे…

53 मिनिटे ago

मुंबई–गोवा महामार्गासाठी ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प; चाकरमान्यांना ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या…

3 तास ago

झोपडपट्टीमुक्त मुंबई हवी, पण माणूसमुक्त नव्हे; SRA-MHADAच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचा मार्ग

मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने…

5 तास ago