माव्र्हल एम्पायर सोसायटीतील गैरव्यवहारामुळे अनेक नागरिक फसले; शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं. ३०९/१ मधील तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीचा एन.ए. प्लॉट विक्री आणि बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश जारी केला आहे. या जमिनीवर सध्या न्यायालयीन दावा सुरु असताना देखील ५० पेक्षा जास्त प्लॉट्स विकण्यात आले असून, विक्री आणि बांधकाम अजूनही सुरु होते.
या गटाला नियमबाह्य पद्धतीने बिनशेती परवानगी मिळाल्याचा आरोप परशुराम पाचर्णे यांनी केला असून, त्यांनी दाखल केलेल्या अपिलावर प्रांताधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात ले-आऊट मंजुरीदरम्यान नियमानुसार आयताकृती अथवा चौकोनी आकारात ओपन स्पेस ठेवणे बंधनकारक असताना त्रिकोणी आकारात ओपन स्पेस दाखवण्यात आला. तसेच १५% अमिनिटी स्पेसची अट धाब्यावर बसवत केवळ ५% जागा दाखवण्यात आली. एवढ्यावरच न थांबता नगरपरिषद अभियंता व मुख्याधिकारी यांनी चुकीच्या नकाशाला मंजुरी दिली.
चुकीच्या ले-आऊटनुसार तहसिलदारांनी बिनशेती आदेश दिला आणि भूअभिलेख विभागाने त्या आधारे पोटहिस्से करून ७/१२ मध्ये नोंदी घेतल्या. यामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकारामुळे अनेक नागरिक फसले असून त्यांनी प्लॉट खरेदी करताना एन.ए. ऑर्डर आणि ले-आऊटची प्रत मिळवलेली नव्हती. प्रांताधिकाऱ्यांनी तहसिलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सर्व कागदपत्रांची पडताळणी करून लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात अनेक शासकीय बडे अधिकारी अडकण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांना न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा जागवल्या जात आहेत.
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…
शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…
पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…
घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…
आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…