मुख्य बातम्या

घोड धरणातील अवैध वाळू उपशावर महसुल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

शिंदोडी (तेजस फडके) घोड धरणातुन अवैधरीत्या वाळू उपसा करुन वाहतुक करणाऱ्या हायवावर शिरुर महसुल विभाग आणि पोलिसांनी गुनाट-चिंचणी रस्त्यावर संयुक्त कारवाई करत दोन हायवा ताब्यात घेतले आहेत. या दोन हायवा मध्ये प्रत्येकी चार ब्रास प्रमाणे आठ ब्रास वाळू असल्याचे महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

घोड धरणातील अवैध वाळू उपशाबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी आवाज उठवत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर गुनाट-चिंचणी रस्त्यावर पोलिस व महसुल विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या दोन हायवा ट्रक आज (दि २९) रोजी पकडल्या. त्यानंतर पंचनामा करुन त्या दोन हायवा महसूल विभागाने ताब्यात घेतल्या असुन या दोन हायवा मध्ये मिळून आठ ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे.

 

तसेच पुढील कारवाईसाठी मंगळवार दि ३१ डिसेंबर २०२४ रोजी महसूल विभागाने यावर सुनावणी ठेवली असुन त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

16 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago