मुख्य बातम्या

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई…परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत काही दिवसांपुर्वी स्थानिक गुन्हे शाखेने तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार ७८१ किंमतीचा गुटखा जप्त केला. शिरुर तालुक्यात अवैध धंद्याना ऊत आलेला असताना शिरुरचे उपविभागीय अधिकारी कार्यालय नेमक काय करतंय अशी दबक्या आवाजात सगळ्या तालुक्यात चर्चा सुरु आहे.

शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर या तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत मटका, गुटखा, गावठी दारु, एम डी पान मसाला, खर्या सारख्या अनेक आरोग्यास घातक पदार्थांची विक्री चालु आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपुर्वी शिरुर मध्ये अवैध धंद्यावर धडक कारवाई करत १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार ७८१ किंमतीचा गुटखा जप्त केला. या कारवाईनंतर अनेक चर्चांना उधाण आले असुन स्थानिक गुन्हे शाखेला जी माहिती मिळाली ती स्थानिक पोलिसांना मिळाली नाही का…? की माहिती मिळुनही स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

तालुक्यातील अवैध धंद्याकडे उपविभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…? 

शिरुर, रांजणगाव MIDC तसेच शिक्रापुर हि तीन पोलिस ठाणी शिरुर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतात. या तिनही पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याना सध्या ऊत आला आहे. तसेच या तिनही पोलिस स्टेशन मध्ये अनेक गुन्ह्यांचा तपास बाकी आहेत. तर काही गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी आरोपीना मदत करत असल्यामुळे शिक्रापुर आणि शिरुर येथील दोन पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचारी निलंबित झालेले आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांचेच तालुक्यातील गुन्हेगारीवर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

याबाबत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

(क्रमश:) 

शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

शिरूर वनविभागातील वनपाल महिलेची दोन वर्षाची वेतनवाढ कायम स्वरूपी रद्द

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago