क्राईम

धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मुलान केली आईचीच हत्या

वसई: गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं असून, तरुणाई त्याच्या विळख्यात येताना दिसत आहे. कोणी यामध्ये पैसे गमावले आहेत, कोणी मानसिक स्थैर्य तर कोणी याच गेमिंगमुळं गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रवृत्त होताना सुद्धा दिसत आहेत. अशीच एक घटना घडली आहे वसईमध्ये, जिथं ऑनलाईन गेम खेळण्यासाठी एका मुलानं सावत्र आईचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

का केली मुलानं आईची हत्या

ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे हवे असल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वसईत उघडकीस आला. आरसीया खुसरो असं मृत महिलेचं नाव असून इम्रान खुसरो असं आरोपी मुलाचं नाव आहे.

इम्रानला होतं खेळाचं व्यसन

ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात असलेल्या इम्रान खुसरो (32) याला मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन होतं. त्याला ‘व्हीआरपीओ’ नावाचा गेम खेळण्यासाठी 1 लाख 80 हजारांची गरज होती. त्याने हे पैसे सावत्र आई आरसीया हिच्याकडे मागितले. मात्र तिने पैसे दिले नाहीत. या रागात इम्रान शनिवारी बाभोळा येथील आरसीया यांच्या घरी गेला आणि तिथं त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोके आपटून आईचीच क्रूर हत्या केली.

पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांची साथ?

घडला सर्व प्रकार इम्रानने वडिलांना सांगितला आणि त्यानंतर दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तातडीने विधी करत मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवलं होतं. या बाप लेकाने परिसरातीलच एका डॉक्टरकडून आरसीया नैसर्गिक रित्या मरण पावल्याचं प्रमाणपत्र घेतलं होतं.

मोलकरणीला संशय आला आणि…

इम्रान आणि त्याच्या वडिलांनी मृतदेह नष्ट करण्यासाठीच्या हालचाली केल्या खऱ्या मात्र. त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला घरातच रक्ताचे डाग दिसले आणि हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं आरोपी बाप लेकाला अटक केली. या गुन्ह्यात डॉक्टरचाही सहभाग दिसून येत असून पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत असल्याची माहिती तूर्तास समोर आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

16 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

24 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago