मुख्य बातम्या

मंगलदास बांदल करणार रविवारी भूमिका जाहीर

शिरुर मध्ये होणार मंगलदास बांदल यांची भव्य पत्रकार परिषद

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल सध्या कारागृहातून बाहेर आलेले असून पुढील रणनीती ते रविवारी जाहीर करणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल एका बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी तब्बल 22 महिने कारागृहात होते. 22 महिन्यांनी ते कारागृहाबाहेर आलेले असून त्यांनी आपल्या भागातील अनेक ठिकाणी सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

मात्र बांदल यांच्यावर गुन्हे दाखल होण्याचे काही दिवस आधी त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदावरुन पत्र काढत हकालपट्टी करण्यात आलेली होती त्यांनतर बांदल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नव्हता. मात्र आता कारागृहातून बाहेर आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कामाला लागले.

मात्र बांदल सध्या कोणत्याही पक्षात नसताना आता ते काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आता रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मंगलदास बांदल शिरुर येथे पत्रक्र परिषद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून आता बांदल काय गौप्यस्फोट करणार आणि राजकारणातील कोणती रणनीती आखणार तसेच कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार कि अपक्ष पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

14 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

14 तास ago