मुख्य बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे महिबबु सय्यद यांचे आमरण उपोषण सुरु…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये मनसेचे महिबबु सय्यद हे आपल्या कार्यकर्त्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. शिरुर नगरपरिषदेला गेले दोन वर्षे पासून अनेक विषयांचा पाठपुरावा करुनही अनेक विषयांना न्याय मिळत नसल्यामुळे अखेर नाईलाजास्तव ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (दि ८) जुलै पासुन आमरण उपोषणाला बसले आहे.

 

अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय भंगार साहित्य विल्हेवाट, शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे, घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पध्दतीने न होणेबाबत, शहरातील अनधिकृत बांधकामे, शहरातील रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग, अनधिकृत मोबाईल टॉवर, विजेच्या खांबातून वीज चोरी प्रकरण, जिओ कंपनीचे फुटपाथवरील अतिक्रमण, कोअर प्रोजेक्ट या संस्थेवर दंडात्मक कारवाई, जलशुध्दीकरण केंद्राशेजारी फाऊंटन दुरुस्ती, बसस्थानक शेजारील नाल्यातील अनधिकृत भिंत बांधकाम, पुर रेषेतील अनधिकृत बांधकामे, शिरूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी प्रक्रिया व मलनिःसारण प्रकल्प इत्यादी विषयांच्या मागण्यांसाठी मनसेच्या वतीने आंदोलन करत असल्याचे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी सांगितले आहे.

या उपोषणासाठी प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, शिरुर शहर सचिव रविराज लेंडे, आदि उपस्थित होते. या आंदोलनाला शिरुर व परिसरातील विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे.

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक ;हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago