मुख्य बातम्या

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्राच्या दत्तनगर येथील जिल्हा परीषद शाळेतील महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या दोन शिक्षकांनी शिक्षणविस्तार अधिकारी रघुनाथ पवार यांना (दि. २८) जून रोजी मारहाण केली होती. त्यानंतर तातडीने त्या दोघांवर गटविकास आधिकारी महेश डोके यांनी (दि १) जुलै रोजी निलंबनाची कारवाई केली होती. परंतु ते त्या शाळेवर अद्यापही कार्यरत आहे.

 

या दोन शिक्षकांच्या निलंबनाचा आदेश त्यांना व्हॉट्स अप,ई मेल, टपालाद्वारे पाठवण्यात आला होता. केंद्रप्रमुख दगडू वेताळ हे प्रत्यक्ष निलंबनाची ऑर्डर घेऊन गेले होते. त्यांनी स्विकारण्यास नकार दिला. गटविकास आधिकाऱ्यांचा आदेश डावलून शिक्षक त्या शाळेवर कामकाज करत आहे. दोन दिवस रजेवर जावून ते परत हजर झाले. त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या अनिल वाखारे या शिक्षकाला तेथून परत जाण्यास भाग पाडले.

 

आता तालुक्यातील राजकिय पुढाऱ्यांद्वारे ते प्रशासनावर दबाव आणत असल्याची चर्चा होत आहे. या प्रकाराबाबत गट शिक्षण आधिकारी हे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांच्या भेटीला गेल्याची सुत्रांची माहीती आहे. तीन वर्गखोल्यांना त्यांनी कुलुप लावले असून ते आज ( दि. ०८) रोजी रजेवर गेले आहे. सर्व रजिस्टर कुलुपबंद असून त्यांच्या जागी येणाऱ्या शिक्षकाला हजेरी लावणे मुश्किल झाले आहे.

 

एक तारखेला निलंबित केल्याची ऑर्डर असताना मारहाण करणारे मुजोर शिक्षक वरिष्ठांचे आदेश जुमानत नसल्याची चर्चा तालुका भर होत आहे. त्यामुळे यां दोन शिक्षकांना नक्की कोण पाठीशी घालयत…? राजकीय दबावापोटी प्रशासनाला निलंबन मागे घ्यावे लागणार का…? अशी चर्चा शिरुर तालुक्यातील शिक्षकांमध्ये चांगलीच रंगली आहे. राजकीय नेत्यांनी या शिक्षकांना वाचवण्यासाठी मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना फोन केल्याची माहीती समोर येत आहे. आता या घटनेबाबत मारहाण झालेल्या विस्तार आधिकाऱ्याला न्याय मिळणार का…? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

हे दोन्ही शिक्षक बळजबरीने शाळेवर येत आहेत. मी निलंबनाचा आदेश दिला असता त्यांनी तो स्विकारला नाही. ते परत दोन दिवस रजेवर गेले आहे. सर्व रजिस्टर लॉक करून ठेवल्याने नविन शिक्षकाची दुसऱ्या नवीन रजिस्टरवर हजेरी घेणार आहे.

दगडू वेताळ (केंद्रप्रमुख) 

शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

5 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

10 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago