रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील अनेक पोलिस निरीक्षकांच्या काल (दि 13) रोजी कार्यकाल पुर्ण झाल्याने बदल्या झाल्या रांजणगाव MIDC चे तत्कालीन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांचा कार्यकाल पुर्ण झाल्याने त्यांची मंचर पोलिस स्टेशन येथे बदली झाली. तर त्यांच्या जागी महेश ढवन यांनी आज(दि 14) रोजी रांजणगाव MIDC चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक म्हणुन पदभार स्वीकारला. यावेळी परिसरातील अनेक राजकीय व्यक्तींनी पोलिस निरीक्षक ढवन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शिरुर ग्रामीण मधील रामलिंग येथे दोन महिन्यापुर्वी एका 33 वर्षीय महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी “त्या” महिलेने सहा पानी सुसाईड नोट लिहिली होती. त्या सुसाईड नोट मध्ये उल्लेख असलेला रांजणगाव MIDC मधील बांधकाम व्यावसायिक आणि परिसरातील एका गावचा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या “एका” राजकीय पुढाऱ्याने नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन गेले दोन महिने सतत वृत्तपत्रात बातम्या येत असताना “हा” राजकीय पुढारी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित नव्हता. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचा नवीन पोलिस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारताच “तो” सत्कारासाठी हजर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…