शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी (दि. 24) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःची कार व बंगला पेटवून देऊन गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेल्याची घटना घडली. मात्र शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी तातडीने आग विझवीत बंगाल्यात कार पेटवणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई वडील वाजेवाडी मध्ये गेलेले असताना प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली एम एच १२ ए जि ९४१८ हि कार पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लागली. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार भरत कोळी, उद्धव भालेराव, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, कचरुनाना वाजे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.
दरम्यान कारचे मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने चारही टायर तसेच एच पी च्या सिलेंडरने स्फोट घेतला, तर आग लावणारा युवक फरार झाला, यावेळी प्रकाश गायकवाड, कचरुनाना वाजे, वैभव दरेकर, प्रकाश वाजे, रवी वाजे, गजानन गायकवाड, काळूराम बोत्रे, संदीप जगताप यांसह आदींनी शेजारील पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली.
मात्र तोपर्यंत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही चीज वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान जाळपोळ करणारा प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांनी सदर ठिकाणी जात प्रज्योत याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही पोलीस करत आहे.
यात्रेच्या दिवशीच घडलेल्या प्रकाराने हळहळ…
पिंपळे जगताप गावची काळ पासून यात्रा सुरु यात्रेमुळे पाहुणे घरी येत असतात मात्र ऐन यात्रेच्या दिवशीच गावामध्ये सदर युवकाने स्वतःचा बंगला आणि कार पेटवून दिल्याची घटना घडल्याने परिसरात नागरिक व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …