महाराष्ट्र

भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली…

औरंगाबाद: देशाची राजधानी दिल्लीत दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 28 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्लीसोबतच दिल्ली एनसीआर, उत्तरप्रदेश आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथेही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

जवळपास दोन मिनिटांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता आणि भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जमीनपासून 10 किमी खोलीवर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवल्याचे सांगितले जातेय. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नवीन वर्षात दिल्ली आणि परिसरात भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे.

दरम्यान यापूर्वी 5 जानेवारीला सायंकाळी 7.56 मिनिटांनी दिल्ली-एनसीआर व काश्मीरमध्ये भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.9 नोंदवण्यात आली. त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या फैजाबादहून 79 किमी दूर हिंदूकुश पर्वत रांगांत होते.

याशिवाय नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी रात्रीही दिल्लीत भूकंप झाला होता. राष्ट्रीय भूकंप मापन विज्ञान केंद्राने सांगितले की, 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.19 च्या सुमारास 3.8 तीव्रतेचा भूकंप आला. त्याचे केंद्र हरियाणाच्या झज्जरमध्ये होते. त्याची खोली जमिनीखाली 5 किमी आत होती. पण सुदैवाने त्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त झाली नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

14 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

18 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

18 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

18 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

18 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

19 तास ago