मुख्य बातम्या

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी ई केवायसी करावी:-सिध्देश ढवळे

शिरुर: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना योजनेचा पुढील लाभ चालू राहण्यासाठी केंद्र सरकारने e kyc बंधनकारक केलेले असून लाभार्थीच्या ई केवायसी चे काम १०० टक्के पुर्ण करण्यासाठी शिरूर तालुक्यात ३१ ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कामी प्रत्येक गावात ज्या लाभार्थ्यांचे ekyc बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या विविध माध्यमातून प्रसिद्ध केल्या असुन कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक गावपातळीवरील काम करत आहे. सर्व लाभार्थ्यांनी ekyc 31 ऑगस्ट 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थीच्या ई केवायसी चे काम पुर्ण होण्याकामी हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहीम अंतर्गत दि २७ व २८ रोजी याद्याला प्रत्येक गावात प्रसिद्धी देण्यात आली आहे व दि २९,३०,३१ रोजी विशेष ekyc कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. लाभार्थी स्वतः ekyc करू शकतात किंवा आपल्या जवळच्या csc केंद्रात जाऊन e kyc करू शकतात. ज्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक आहेत त्यांना मोबाइल वर ई केवायसी करता येईल व ज्यांचा मोबाइल नंबर आधार कार्ड शी लिंक नसेल अशा लाभार्थीने सी एस सी सेंटरवर जाऊन ई केवायसी करता येईल असे ही सिध्देश ढवळे यांनी सांगितले आहे.

तसेच ई केवायसी चे काम १०० टक्के पुर्ण करून आपल्या गावातील एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी गावचे पदाधिकारी यांनी ही मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे . शेतकऱ्यांना ई केवायसी करताना काही अडचण आल्यास आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

5 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

5 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

6 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

6 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

6 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

6 तास ago