मुख्य बातम्या

शिक्रापुरच्या शारदा लॉजवर वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिसांनी येथील शारदा लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच धडक कारवाई करत पाच महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी लॉज चालक संतोष सीना पुजारी (वय ३७, रा. शिक्रापुर) याला अटक करण्यात आली आहे.

शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पुजारी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, विकास पाटील, शरद कारकुड, अस्मिता जोंधळे यांनी या कारवाईत सहभाग घेत तातडीने पाच पीडित महिलांची मुक्तता केली.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख करीत आहेत. शिक्रापुर पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांना चाप बसण्याची शक्यता असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई;परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago