आरोग्य

सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे

दूध आरोग्यासाठी उत्तम का आहे

दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. दुधामध्ये कॅल्शियम , प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

हाडे आणि स्नायू मजबूत होतात

दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच समावेश असतो. हे दोन्ही घटक हाडांपासून महत्त्वाचे मानले जातात. दूध हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा प्रकार) आणि वृद्धापकाळातील फ्रॅक्चर टाळण्यास मदत करू शकते. त्यामुळे दुधाचे नियमित सेवन करावे. याशिवाय दुधामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात जे स्नायूंसाठी फायदेशीर मानले जातात .

दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

दूध हे दातांकरता देखील लाभदायक आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक दातांचे संरक्षण करतात. तसेच दुधाचे सेवन केल्याने दात निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे दात मजबूत ठेवायचे असतील तर दररोज दुधाचे सेवन करा.

दुधाच्या सेवनाने वजन कमी होते

वाढते वजन कमी करण्यासाठी दूध उपयुक्त ठरू शकते. एका संशोधनानुसार, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या ३८% मुलांचे वजन कमी करणाऱ्यांच्या तुलनेत नियंत्रित होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत आणि प्रथिने वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. दुधाचे सेवन केल्याने जेवण अधिक प्रमाणात जात नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

दररोज दुधाचे सेवन केल्याने हृदय उत्तम राहण्यास मदत होते. दुधाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होऊ शकते. एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज २०० मिली दुधाचे सेवन करतात, त्यांना स्ट्रोकचा धोका ७ टक्के कमी असतो.

मधुमेहासाठी फायदेशीर

दररोज दूध प्यायल्याने मधुमेहाचा धोकाही टाळता येतो. त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. दुधात असलेल्या फॅटी अॕसिडमुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. याच अभ्यासात असेही म्हटले आहे की यावर अधिक संशोधन आवश्यक आहे, ज्यामुळे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी मदत होईल.

पोटासंबंधित आजार बरे होतात

दुधामुळे अपचन आणि अॕसिडिटी तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दुधात अँटासिडचा समावेश असतो. ज्यामुळे अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी थंड दूध वापरावे. थंड दूध पोटातील आम्ल कमी करते.

झोपेसाठी उत्तम

अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने झोप चांगली लागते. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन ही अमीनो अॕसिड असतात. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. रात्री झोप न लागणे किंवा अस्वस्थ वाटू लागणे अशा समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध रोज प्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago