शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. पुणे LCB ने अटक केलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मण संजय शिरसाट (वय ३२), देविदास संजय शिरसाट (वय २४), आदित्य भाऊसाहेब कणगरे (वय २१) आणि आकाश श्रावण चक्रनारायण (वय २०) यांच्यासह एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. हे सर्व आरोपी (नेवासा फाटा, संभाजीनगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता तसेच इतर कलमांनुसार दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान वरील आरोपी निष्पन्न झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
LCB ने ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात पुणे ग्रामीण LCB ने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस फौजदार संजय पड्याळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील आणि पोलीस अंमलदार सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…
मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…