मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील वाहनाला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर…

शिरूरः अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. आहे. गुढी पाडव्यादिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा हा अपघात झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अपघातग्रस्त आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. मध्यरात्री गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील 16 जण अपघातग्रस्त असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

देवदर्शनासाठी अहमदनगर पुणे मार्गावर एका टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावर कामगार गावाजवळ पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टेम्पोवर येऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी झालेल्या भीषण अपघातात राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा मृत्यू झाला. जखमींना नगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात चार जण ठार झाले असून त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

8 तास ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

9 तास ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

1 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

1 दिवस ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

3 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

3 दिवस ago