महाराष्ट्र

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नका; नाना पटोले

मुंबई: आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारी आहे. हे कर्माचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत आहेत. शासनाने याचा सहानुभीपूर्वक विचार करुन कामावरून काढून टाकण्याचे शासन पत्रक रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, ‘रोजंदारी व तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेऊ नये’, असे शासन पत्रक आदिवासी विभागाने २५ मे २०२३ रोजी काढले आहे. शासनाचे हे पत्रक या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बिरसा ब्रिगेड, सह्याद्री यांनी शासनाचे हे पत्रक रद्द करण्याची मागणी केलेली आहे व त्यांची ही मागणी रास्तच आहे.

महागाईने जनता त्रस्त आहे, त्यातच बेरोजगारीची समस्या भेडसावत असताना सरकारने कोणाला कामावरून कमी करणे योग्य नाही. वर्षानुवर्षे हे कर्मचारी सरकार आपल्याला सेवत कायम करेल या आशाने काम करत आहेत. त्यांना सेवेत कायम करण्याचे सोडून या आदिवासी बांधवांचे रोजगार हिरावून घेतले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष देऊन हे अन्यायकारी शासन पत्रक रद्द करावे व आदिवासी बांधवांना सेवेत सामावून घ्यावे, असे पटोले म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago