मुख्य बातम्या

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन टोळ्यांतील ४ सराईत गुन्हेगार जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि वेल्हे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या दोन वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तीन जबरी चोरीचे (Robbery) गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

१४५ किमीचा पाठलाग आणि ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी…

शिरुरमधील बागवाननगर परिसरात २९ मार्च २०२६ रोजी प्रमिला पडवळ या महिलेच्या गळ्यातील ६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दोन दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरुर ते अहिल्यानगर आणि पुन्हा अहिल्यानगर ते शिक्रापुर-चाकण अशा १४५ किलोमीटरच्या परिघातील तब्बल ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

दोन आरोपीना अटक करत तपास…

त्यानंतर आरोपी चाकण परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रेकॉर्डवरील अनिल गोरखनाथ मस्के (वय ३३, रा. चिखली) आणि अभिजित सुभाष रॉय (वय २६, रा. म्हेत्रेवाडी, चिखली) या दोन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. अभिजित रॉय याच्यावर १८, तर अनिल मस्के याच्यावर १० मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वरील दोन्ही आरोपीकडुन साडेतीन तोळे सोने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

वेल्ह्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या टोळीला २४ तासांत अटक…

पुणे ग्रामीणच्या वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत ५ एप्रिल रोजी राहुल कोंढरे या ठेकेदारावर कोयत्याने हल्ला करुन, त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १८ तोळे सोने आणि रोख रक्कम लुटली होती. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने चक्र फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत अभिषेक सचिन खुटवड (वय २३, रा. कात्रज) आणि प्रसाद सतीश शिंदे (वय २१, रा. शनीनगर, कात्रज) या दोन आरोपींना सापळा लावून अटक करत त्यांच्याकडुन १ लाख ९३ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज (मोबाईल, सोन्याची अंगठी, चेनचा तुकडा, रोख रक्कम आणि ॲक्टिव्हा गाडी) जप्त केली. आरोपी अभिषेक खुटवडवर ४ तर प्रसाद शिंदेवर २ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

चारही आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी…

शिरुरमधील दोन आरोपींना ११ एप्रिलपर्यंत, तर वेल्ह्यातील दोन आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळ्यांकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या पथकाने बजावली कामगिरी…

हि धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस नि रीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, हनुमंत पासलकर, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, सागर धुमाळ, सागर नामदास, अमोल शेडगे, मंगेश भगत, तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अतुल डेरे, महेश बनकर, अतुल फरांदे, शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार ज्ञानदीप धिवार, सोमेश राऊत, रोहीत मरभळ यांनी केली आहे.

शिरुर तालुक्यासाठी 1100 कोटींच्या सिंचन प्रकल्पाला गती; सिंचन भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक

शिरुरमध्ये ATS ने धडक कारवाई करत गावठी पिस्टलसह दोघांना घेतले ताब्यात

शिरुरमध्ये एटीएस चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

शिरुर; माता नव्हे तु वैरीणी! मातृत्वाला काळिमा फासत अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा खून

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

7 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

7 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

8 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

8 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

8 तास ago