मुख्य बातम्या

शिरुरमध्ये किरकोळ कारणावरुन एका मुलासह आईवर जीवघेणा हल्ला

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील करंजुलेनगर येथे अत्यंत किरकोळ कारणावरुन सुरु झालेला वाद थेट मारामारीत परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोखंडी खुट्या ठोकण्याच्या कारणावरुन संतापलेल्या तिघांनी एका तरुणासह त्याच्या आईवर विटा आणि हातोडीने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अमोल बाळासाहेब करंजुले (वय २९, रा. करंजुलेनगर, ता. शिरुर) या युवकाने शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी ज्ञानदेव सिताराम करंजुले, बबई सिताराम करंजुले आणि किशोर करंजुले (सर्व रा. करंजुलेवस्ती, ता. शिरुर) यांनी एकत्रितपणे हा हल्ला केला.

फिर्यादी अमोल करंजुले हे आपल्या घरासमोर लोखंडी खुट्या ठोकण्याचे काम करत असताना आरोपींनी “या ठिकाणी खुट्या लावायच्या नाहीत” असा आक्षेप घेत वाद घातला. सुरुवातीला केवळ बोलाचालीत असलेला वाद काही क्षणांतच चिघळला आणि आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी सुरु केली.

यानंतर तिघांनी एकत्र येत अमोल करंजुले आणि त्यांच्या आई शोभा यांना लक्ष्य करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. परिस्थिती अधिकच गंभीर करत आरोपी ज्ञानदेव करंजुले याने घटनास्थळी पडलेले विटांचे तुकडे उचलून अमोल याच्या डाव्या पायावर फेकून मारले. तसेच दुसरा विटेचा तुकडा थेट त्यांच्या आई शोभा यांच्या दिशेने फेकल्याने त्यांना त्या डोक्यात लागल्याने त्या जखमी झाल्या.

या भांडणाची तीव्रता इतकी वाढली की, आरोपी ज्ञानदेव करंजुले याने अमोल याच्या हातातील हातोडी हिसकावून घेतली आणि त्या हातोडीच्या लोखंडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर जोरदार मारहाण करत गंभीर दुखापत केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, किरकोळ कारणावरुन एवढ्या टोकाला गेलेल्या या वादामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास शिरुर पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल कोथळकर करत आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन टोळ्यांतील ४ सराईत गुन्हेगार जेरबंद

शिरुर तालुक्यासाठी 1100 कोटींच्या सिंचन प्रकल्पाला गती; सिंचन भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

8 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

8 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

9 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

9 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

9 तास ago