महाराष्ट्र

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलचा पुन्हा जिल्ह्यात डंका; मंथन परीक्षेत भावेश भरडे अव्वल…

पुणे: राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या मंथन परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथील विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. भावेश भरडे याने ३०० पैकी २८४ गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला. या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भावेशच्या या यशामागे त्याच्या शिक्षिका वर्षा विलास थोरात यांची वर्षभर घेतलेली परिश्रमपूर्वक मेहनत महत्त्वाची ठरली. त्यांनी नियमित शालेय वेळेबरोबरच दररोज अतिरिक्त तास घेऊन विद्यार्थ्याची विशेष तयारी करून घेतली. सातत्यपूर्ण सराव, संकल्पनांची स्पष्टता आणि वेळोवेळी घेतलेल्या चाचण्यांमुळे भावेशने उत्कृष्ट गुणांची कमाई केली.

या यशामागे शाळेचे आधारस्तंभ काकासाहेब रामराव सातव पाटील (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आव्हाळवाडी तथा चेअरमन-ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रा. लि., पुणे) यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत अशोकराव सातव पाटील यांचे सहकार्यही मोलाचे ठरले. हवेली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी शंकर मुंडे, केंद्रप्रमुख प्रज्ञा बांदल यांचे मार्गदर्शन लाभले.

यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कालप मॅडम यांचे नेतृत्व आणि सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य यामुळे विद्यार्थ्याला योग्य शैक्षणिक वातावरण मिळाले. भावेशच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून तसेच पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलने शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलचा जिल्ह्यात पुन्हा डंका…

पुणे जिल्ह्यात जि प प्राथमिक शाळा डोमखेल शाळेचा ६वी नवोदय प्रवेश परीक्षेत डंका…

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!

डोमखेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार…

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

8 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

15 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

15 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago