मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिसांनी आरोपीला धाराशिव जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडुन ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळे परिसरात दाट लोकवस्ती असून दुचाकी वाहनांचीही मोठी वर्दळ असते. मागील काही दिवसांपासून परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देत तपासाला गती दिली होती.

रांजणगाव गणपती येथील राजेंद्र गोटीराम जाधव यांची हिरो होंडा कंपनीची डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम एच २३ बीजे ५८३६ ही १६ जुलै २०२६ रोजी महागणपती पार्किंगमधून चोरीस गेली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ आणि पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड यांनी परिसरातील सुमारे २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजसह इतर तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

यावेळी तपासामध्ये शंकर भगवान गोसावी (वय ३८, रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव) याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने धाराशिव जिल्ह्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली.

आरोपीला २२ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाकडून त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. आरोपीकडे कसून चौकशी सुरु असुन, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड आणि पोलिस हवालदार अजित पवार यांनी हि कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अजित पवार करीत आहेत.

CCTV तपास ठरला महत्त्वाचा…

मोटारसायकल चोरीनंतर तपास पथकाने परिसरातील २५ ते ३० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. फुटेज आणि तांत्रिक माहितीची सांगड घालत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्यानंतर थेट धाराशिव जिल्ह्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेत चोरीची मोटारसायकल हस्तगत केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

4 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

5 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

5 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

5 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

5 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

5 तास ago