‘महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी’ म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. “देवेंद्र! बस नाम ही काफी है,” असे म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांना “बुद्धिमान, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आणि विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते” अशी विशेषणे बहाल केली.
शेक्सपिअरच्या “नावात काय आहे?” या प्रसिद्ध उक्तीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “मी म्हणतो, ‘देवेंद्र! बस नाम ही काफी है!'” तसेच त्यांनी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील “बिग डी” संबोधत त्यांच्यातील डिव्होशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंग या गुणांचा गौरव केला.
फडणवीस हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) नव्हे, तर नैसर्गिक बुद्धिमत्तेवर (NI) विश्वास ठेवणारे नेते असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांच्या कायद्यावरील प्रभुत्व, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अथक परिश्रम आणि विकासासाठीचा ठाम निर्धार यांचे विशेष कौतुक केले.”देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची धगधगती ज्वाला आहेत. त्यांच्यासारख्या संवेदनशील, निष्कलंक आणि अहोरात्र काम करणाऱ्या नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” असेही शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त त्यांचे वय नव्हे, तर कर्तृत्व, जनविश्वास आणि कीर्ती अधिक वाढत असल्याचे नमूद करत, त्यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा शिंदे यांनी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या संदेशातून महायुतीतील समन्वय, परस्पर विश्वास आणि राज्याच्या विकासासाठी दोन्ही नेते एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…