महाराष्ट्र

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनमध्ये आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील, राज्यभरातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.

दादाजी भुसे म्हणाले की, वर्गखोलीत प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा अनुभव हा शिक्षण विभागासाठी सर्वात मौल्यवान मार्गदर्शक आहे. शिक्षकांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अनुभवांच्या आधारे भविष्यातील शैक्षणिक धोरणे अधिक सक्षम व परिणामकारक करण्यात येतील.

शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून सुसंस्कारित, जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही भुसे यांनी नमूद केले. विचारमंथनातून आलेल्या सकारात्मक सूचना आणि शिफारसींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दिवसभर आयोजित कार्यशाळेत अध्ययन-अध्यापनातील प्रयोग, शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, योग व अध्यात्म, शालेय सैनिकी शिक्षण, कला-क्रीडा-अभिनय उपक्रम, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी, आव्हाने आणि संधी या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

4 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

4 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

4 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

4 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

4 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

5 तास ago