महाराष्ट्र

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उद्घाटन

प्रभात निर्मित संत तुकाराम चित्रपटाचे खास रसिकांसाठी प्रदर्शन; चित्रपट संस्कृतीला नवे व्यासपीठ

मुंबई: सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही चित्रपट संस्कृति जिवंत ठेवण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असून याचे एक पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेले दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, १७ सप्टेंबर रोजी या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रभात फिल्म कंपनी निर्मित संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. हा उपक्रम पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाट्यगृहात पार पडणार असून दुपारी ३ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची स्थापना करण्यामागे प्रमुख उद्देश हा दर्जेदार चित्रपट बघणारा रसिकवर्ग घडविणे आहे. जुन्या काळातील गाजलेले आणि ऐतिहासिक महत्त्वाचे चित्रपट तसेच नव्या पिढीने निर्मित केलेले सकस, प्रगल्भ व विचारप्रवर्तक चित्रपट यांचा रसिकांना आस्वाद घेता यावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील सांगितले.

उद्घाटनाच्या सोहळ्यात दाखविण्यात येणारा संत तुकाराम हा प्रभात कंपनीने १९३६ साली निर्मित केलेला एक ऐतिहासिक चित्रपट आहे. दिग्दर्शक विष्णुपंत दामले आणि शेख फतेलाल यांनी याचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने केवळ मराठीच नव्हे तर जागतिक पातळीवरही लौकिक मिळवला. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे रसिकांना मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाची झलक अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. चित्रपट प्रदर्शन किंवा उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक प्रेक्षकांनी ९७०२२७०८२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

9 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

10 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

10 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

10 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

15 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

15 तास ago