मुख्य बातम्या

रांजणगाव पोलिसांची जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई; १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करत पोलिसांनी रोख रकमेसह १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार विलास सूर्यभान आंबेकर (वय ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ७ मे २०२५ रोजी दुपारी ३च्या सुमारास बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतील भांबर्डे ते करडे रोड लगत एका शेतातील झाडाखाली १)बाळू कृष्णाची बत्ते (वय ४२) रा. रांजणगाव गणपती ता. २)नवनाथ सूर्यकांत थीटे (वय ४३) रा. न्हावरे,खंडागळे वस्ती ३)संतोष बाजीराव वाळके (वय ४३) रा.करडे ४)अमोल मारुती गायकवाड (वय ३८) रा.करडे ५)नाना विक्रम पवार (रा. भांबर्डे) 6)शशी वाळके (रा.बाभुळसर खुर्द) ७)गोकुळ गव्हाणे (रा. न्हावरे) हे सर्वजण तेरा पत्त्यांचा रमी जुगार पैशावरती खेळत असताना मिळून आले असुन त्यांच्याकडून २४ हजार ८०० रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहने असा एकूण १२ लाख ५४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, रामेश्वर आव्हाड, उमेश कुतवळ यांनी केली आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

सिंघमगिरी; रांजणगाव MIDC पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचत चार अपहरण झालेल्या कामगारांची केली सुटका

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago