मुख्य बातम्या

महसुल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई, आलेगाव पागा येथून १४ बेठविगार मजुरांची दोन वर्षांच्या बंदिवासातून मुक्तता

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका गुऱ्हाळात बेकायदेशीररीत्या बंदिस्त ठेवण्यात आलेल्या १४ मजुरांची अखेर सुटका करण्यात महसुलव पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. गेली दोन ते तीन वर्षे अत्यंत हालअपेष्टांत अडकून पडलेल्या या मजुरांना गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात प्रशासन आणि लेबर लाईन सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले.

ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण (रा. म्हगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी लेबर लाईन पोर्टलवर तक्रार दाखल करत सांगितले की, आलेगाव पागा येथील एका शेतगुऱ्हाळात ते आणि इतर १३ मजूर जबरदस्तीने मजुरीसाठी अडकवले गेले असून मालकाकडून मानसिक, आर्थिक आणि सामाजिक छळ होत आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, कामगार निरीक्षक संपत गुंजाळ आणि लेबर लाईन संस्था – अजिविका ब्युरो, हडपसर पुणे यांचे संयुक्त पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व १३ मजुरांची सुखरूप सुटका केली.

सुटकेनंतर सर्व कामगारांना शिरूर तहसील कार्यालयात आणून अधिकृत सुटका प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय, त्यांना तातडीने जेवण देण्यात आले आणि त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाने केली.

याप्रसंगी प्रांताधिकारी पूनम अहिरे,तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, कामगार निरीक्षक संपत गुंजाळ तसेच लेबर लाईन संस्थेचे शुभम गुरव, पराग कांबळे, अर्चना यादव हे सर्व उपस्थित होते. तक्रारदार चव्हाण यांनी संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.या धडक आणि प्रभावी कारवाईमुळे गुलामगिरीसारख्या अमानवीय परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबांना नवा श्वास मिळाला आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतलेल्या तातडीच्या निर्णयाबद्दल आणि संपूर्ण प्रशासकीय पथकाच्या सक्रिय सहभागाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

48 मिनिटे ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

1 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

19 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

23 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

23 तास ago