जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई: मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत. समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईल, याबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील
जीवनस्पर्श” या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकर, हिलर डॉ. सुरेश नागरेंकर व हिलर डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन,” अशी सद्भावनेची घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केली. या उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचे, समतेचे आणि माणुसकीचे मंदिर असले पाहिजे. अशा सेवाभावी उपक्रमात मी सदैव पाठीशी राहीन असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी, फिजिओथेरपी, पंचकर्म, अॅक्यूपंक्चर, सुजोक, न्यूट्रिशन थेरपी, योग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…