मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणातुन दि १५ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ५ च्या दरम्यान चिंचणी येथील घोड जलाशयाच्या कडेचा गायरान गट क्रं ७५ तसेच गुनाट (कोळपेवस्ती) येथील चिंचणी जलाशयाचे कडेचा जमिन गट क्रं १६३ मधुन घोड धरणातील पाण्यातुन यांत्रिक बोटीच्या साह्याने एकुण ७ ब्रास प्रति ब्रास ५ रुपये प्रमाणे एकुण किंमत ३५ हजार रुपयांची वाळू अज्ञात चोरटयांनी काढून ती स्वतःच्या फायदयाकरिता चोरी करुन घेवुन गेला असल्याने त्या अज्ञात चोरट्याविरुध्द सरकारतर्फे मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दिली होती.

त्यानंतर वाळु उपसा बंद होणे अपेक्षित होते. परंतु वाळू माफियांनी मात्र महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा सुरुच ठेवला आहे. त्यामुळे घोड धरण नक्की सरकारच्या मालकीचे आहे की वाळू माफियांच्या मालकीचे आहे…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण महसूल विभागाने तक्रार दिल्यानंतरही वाळू माफियांना कसलाही फरक पडलेला नसुन “घोड धरणातील वाळूचा रात्रीच्या वेळेस बेसुमार बेकायदेशीररीत्या उपसा करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क असुन काहीही झालं तरी आम्ही धरणातुन वाळू उपसा करणारच” अशी प्रतिज्ञाच जणु या वाळू माफियांनी केलेली आहे.

 

महसूल विभागाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…

गेल्या दोन महिन्यांपासुन चिंचणी येथील घोड धरणात रात्रीच्या वेळेस ८ ते १० यांत्रिक बोटिंच्या साह्याने चोरट्या मार्गाने बेसुमार वाळू उपसा चालु असुन शिरुर तालुक्यातील चिंचणी, गुनाट, कुऱ्हाडवाडी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, दानेवाडी येथील सुमारे ८ ते १० वाळूमाफिया यांत्रिक बोटिंच्या साह्याने घोडधरणात रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळूउपसा करत असुन हजारो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा करुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असतानाही शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या गावातील वाळू माफिया रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार तसेच बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करत आहेत. तरीही महसूल विभाग याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

कुऱ्हाडवाडी येथुन दिवसा बेकायदेशीर वाळू वाहतुक… 

शिरुर तालुक्यातील निमोणे गावच्या हद्दीतील कुऱ्हाडवाडी येथुन तीन दिवसांपुर्वी दिवसाढवळ्या हायवातुन वाळु वाहतुक सुरु होती. याबाबत महसूल काही कर्तव्यदक्ष नागरिकांनी महसूल विभागाकडे पुरावे सादर केले. परंतु त्यानंतरही महसूल विभागाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महसूल विभागाची वाळू माफियांना मुकसंमती आहे का…? अशीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे. तसेच शिरुरचे तहसीलदार आणि प्रांतअधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशीही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

शिरुर शहरात गांजाचे सेवन करताना पाच जण सापडले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त

शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago