शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील कुंभार आळी, दशक्रिया घाट येथे घोडनदीच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी आडोशाला ५ जण गांजाचे सेवन करत असताना साहित्यासह मिळुन आले आहेत. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ भिमराव हाळनोर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, शिरुर शहरातील दशक्रिया घाटाजवळ दि ११ सप्टेंबर २०२४ रोजी आडोशाला १ )आसीफ रफिक शेख (वय २७ ) रा. हल्दी मोहल्ला, शिरुर, २) वशीम इक्बाल शेख (वय ३२) रा. हुडको काॅलनी, शिरुर, ३) उमेश संभाजी गडकर (वय ३२) रा. गुजरमळा, शिरुर, ४ ) दत्तात्रय काशीनाथ गुळादे (वय ४३) रा. साईनगर,शिरुर, ५ ) दिनेश राम लोखंडे (वय २८ ) रा. सिध्दार्थनगर, शिरुर हे गांजा सेवन करण्याचे साहीत्य मातीची चिलीम त्यामध्ये मळकट कापडी चिंधी, माचीस बॉक्स या साहीत्यासह अंमली पदार्थाचे सेवन करत असताना मिळुन आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे हे करत आहे.
शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त
शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु
शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड