शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील चर्चेचा विषय ठरलेल्या ‘आनंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या’ अध्यक्ष, भागीदार व कामगार यांनी मिळुन कट करुन खोटे व बनावट दस्तऐवज तयार करत पतसंस्थेच्या सभासदांची व ठेवीदारांची एकुण १६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रुपये किंमतीची फसवणुक केली आहे. शिरुर पोलीसांनी या रक्कमेचा अपहार करणाऱ्या आरोपींची दुचाकी तसेच चारचाकी वाहने जप्त केली आहेत.
गेले अनेक दिवस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे .परंतु नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या बड्या धेड्यांवर कारवाई केल्याने या कारवाईचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे. या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे अपहार करणाऱ्या अध्यक्षासह इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. याबाबत संजयकुमार राखाराम मुंडे (वय ५६ वर्ष, रा.लेजर टाऊन, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ३१ डिसेंबर २०१३ ते दि २० फेब्रुवारी २०२० या कालावधीमध्ये ‘आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरुर’ या संस्थेमधील अध्यक्ष, भागीदार व कामगार यांनी मिळुन कट करुन खोटे व बनावट दस्तऐवज तयार करत पतसंस्थेच्या सभासदांची व ठेवीदारांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे संजयकुमार राखाराम मुंडे यांनी केलेल्या ऑडीट मध्ये निष्पन्न झाल्याने त्याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून दि.०९ जुलै २४ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ कायद्याअंतर्गत वरील गुन्हयातील आरोपी यांचे व त्यांच्या फर्मच्या नावे असलेले १५ लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा ट्रक क्रं एमएच १२ पीक्यु ६८८४ हा मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असल्याने जप्त, ८ लाख रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो क्र. एम.एच १२ एन.एक्स ८६३९ ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असल्याने जप्त, ८ लाख रुपये किमतीचा एक पिवळया रंगाचा टेम्पो क्र. एम.एच. १२ क्यु.डब्ल्यु ४५३७ ही मेघहंस हंसराज अँड सन्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया, प्रविण चोरडीया व इतर यांचे नावे असलेला, ५ लाख रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा पिकअप क्र.एम.एच १२ पी.क्यु ६९३७ ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेला, ४ लाख रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती क्र. एम.एच १२ डब्ल्यु एक्स १११४ हा मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेला, ३० हजार रुपये किमतीचा एक पांढरे रंगाची होंडा एक्टीव्हा स्कुटी मो. सायकल क्र.एमएच १२ एच. वाय ६१३२ ही प्रविण चंपालाल चोरडीया यांचे नावे असलेली, ३० हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची टीव्हीएस स्कुटी मोटर सायकल क्र. एम.एच १२ एल क्यु ७५५२ ही प्रितम प्रविण चोरडीया यांचे नावे असलेली, ४० हजार रुपये किमतीची एक ग्रे रंगाची होंडा स्कुटी मोटर सायकल क्र.एम.एच १२ आर.आर ६९९७ ही सविता अभयकुमार चोरडीया यांचे नावे असलेली, ५० हजार रुपये किमतीचा एक काळया रंगाची टिव्हीएस जुपीटर स्कुटी मोटार सायकल क्र. एमएच १२ पीके ६५४२ ही अभयकुमार पोपटलाल चोरडीया यांचे नावे असलेली अशा एकूण चारचाकी व दुचाकी मिळून ४१ लाख ५० हजार रुपये किंमतीचा माल शिरुर पोलिसांनी जप्त केला आहे.
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांरडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, राहुल भवर, पोलीस अंमलदार आकाश नेमाने, वीरेंद्र सुंबे, ज्ञानदेव गोरे या पथकाने केली आहे.
शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु
शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड
शिरुर तालुका कुस्ती स्पर्धेत मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेचे निर्विवाद वर्चस्व