मुख्य बातम्या

शिक्रापुर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश; सात दुचाकी जप्त

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर (ता. शिरुर) पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद करत तब्बल ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शिक्रापूर व रांजणगाव पोलीस ठाण्यातील एकूण ६ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे.

शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी अन्वये अंबादास दुक्कल जाट यांची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१२ डब्ल्युसी ३२१४) हि मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. अलीकडच्या काळात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध घेण्यात आला.

या तपासात आरोपी मंगलसिंग माणिकलाल सत्तावन (२५, रा. कासारी फाटा, शिक्रापुर), धिरज बालाजी क्षिरसागर (१९, रा. मलठण फाटा, शिक्रापूर), योगेश ज्ञानेश्वर जाधव (२७, रा. कासारी फाटा, शिक्रापुर, मुळ रा. लोणीधामणी, ता. आंबेगाव) हे गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपींच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी २ लाख १० हजार रुपये किंमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये शिक्रापुर पोलीस ठाण्यातील ४ व रांजणगाव पोलीस ठाण्यातील २ असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित एका मोटारसायकलीच्या मालकाबाबत तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस संदिप सिंह गिल्ल, पुणे अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखालीशिक्रापुरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, जयराज देवकर, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, प्रतिक जगताप या पथकाने केली आहे.

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

Video; शिरुर तालुक्यात DJ च्या आवाजाने बैल उधळली; दोन लहान मुल जखमी

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago