Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे आज (दि २२) मुसळधार पावसात विजेच्या खांबावर लोखंडी शिडीच्या साह्याने काही व्यक्ती जाहिरातीचा बॅनर लावत होते. हि गोष्ट नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले असताना अशा बॅनरमुळे शॉर्टसर्किट होण्याचा किंवा अपघात घडण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

शासकीय नियमांनुसार महावितरणच्या विजेच्या खांबांवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर, बॅनर किंवा जाहिरात फलक लावणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी अशा जाहिराती लावण्याची जणु सर्रास स्पर्धाच सुरु आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

विजेचे खांब फेक्स व्यावसायिकांसाठी मोफत जाहिरातीचे ठिकाण…? 

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीचे बॅनर लावलेले दिसुन येतात. विजेचे खांब म्हणजे फ्लेक्स व्यावसायिकांसाठी जाहिरात करण्यासाठी हक्काची आणि फुकटची जागाच झाली आहे. शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात प्लाटिंग व्यवसाय सुरु आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी अनेक प्लॉटिंग व्यावसायिक फ्लेक्स प्रीटिंग व्यवसायिकांना फ्लेक्स छापण्यापासुन ते फ्लेक्स लावण्यापर्यंत सर्व ठेके देतात. त्यामुळे फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिकांसाठी विजेचे खांब म्हणजे फुकटची जाहिरात करण्याचे हक्काचे ठिकाण झाले आहे.

महावितरणचे अधिकारी कारवाई करणार का…? 

पावसाळ्यात विजेच्या खांबावर टांगलेले बॅनर, होर्डिंग्ज वा लोखंडी साहित्य हे अपघातांना आमंत्रण देतात. यापुर्वी राज्यात अनेक ठिकाणी अशा निष्काळजीपणामुळे जीवितहानी झाल्याचे प्रकार घडले आहेत. शिरुर तालुक्यातील काही फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या कामगारांचा अशा प्रकारे जीव धोक्यात आहेत. या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई होणार का…? महावितरणच्या निरीक्षकांनी वेळेवर पाहणी करुन असे प्रकार थांबवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Video; शिरुर तालुक्यात DJ च्या आवाजाने बैल उधळली; दोन लहान मुल जखमी

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका