मुख्य बातम्या

उल्लेखनीय; महिलांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एका अट्टल चोराला अटक १० लाखांचे सोने हस्तगत

कारेगाव (तेजस फडके) दुकानात जाऊन पाण्याची बाटली घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक करुन स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तब्बल १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरांकडून एकूण ८ जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपरी दुमाला येथील धनगरवाडा स्नॅक्स सेंटरमध्ये दि २५ मार्च २०२५ रोजी वंदना रोहिदास शेटे (वय ३३) यांच्याकडून एका अनोळखी व्यक्तीने पाण्याची बाटली मागून त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला होता. त्याचा साथीदार स्पोर्ट्स बाईकवर दुकानाबाहेर थांबलेला होता.

त्यानंतर वंदना शेटे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथक करीत होते. तपासा दरम्यान घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करते वेळी वापरलेली स्पोर्टस बाईक टि व्हि एस अपाची कंपनीची असल्याचे निष्पन्न केली. तसेच दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी हि अश्या पध्दतीचे गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पिंपरी चिंचवड येथील गुन्हे शाखेचे पथक, आळंदी व चाकण पोलीस स्टेशनकडील तपास पथके अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशनकडील तपास पथक हे आरोपीचा शोध घेत होते. त्यांनाही सदरचे आरोपी मिळुन येत नव्हते. तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. ३५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले. यावेळी तपास पथकांनी बीड जिल्ह्यातील अड्ड्यापर्यंत तपासाचा माग काढत आरोपीला अटक केले.

या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव मारुती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (रा. लिंबोडी, ता. आष्टी, जि. बीड) असे असुन त्याचा साथीदार शरद बापू पवार (रा. लोणी सय्यद मीर, ता. आष्टी, जि. बीड) हा फरार आहे. या आरोपीकडून रांजणगाव, शिक्रापूर, शिरुर, आळंदी, चाकण (पिंपरी चिंचवड), कर्जत (अहिल्यानगर) येथे घडलेले ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. सद्यस्थितीत आरोपी रांजणगाव एमआयडीसी पोलीस कोठडीत आहे. तसेच अटक केलेल्या आरोपीकडुन १० तोळे २०० मिग्रॅ वजनाचे १० लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच एक टीव्हीएस अपाचे मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, कुलदिप संकपाळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमीन, संजु जाधव, योगेश नागरगोजे, पोलीस अंमलदार सागर धुमाळ, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, पोलीस अंमलदार योगेश गुंड, पोलीस अंमलदार संतोष सांळुखे, पोलीस अंमलदार खरबस, साळवे यांनी केली आहे.

Video; शेतात जायला रस्ताच नसल्याने पाच एकर द्राक्षबाग तोडण्याचा शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

51 मिनिटे ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

1 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

2 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

2 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

4 तास ago