मुख्य बातम्या

साबळेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाणात शासकीय मालकीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी आरोपी भागा हरी भाईक आणि विश्वनाथ भागा भाईक (दोघे रा. साबळेवाडी, ता. शिरूर) यांनी संगनमताने शासकीय खर्चातून उभारण्यात आलेले तार कंपाऊंड आणि चर हे तोडून उध्वस्त केले. सदर तोडफोडीमुळे एकूण अंदाजे २४,६००/- रुपये किमतीचे शासकीय नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३३३, ३२४(४)(५), ३(५) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होण्याची तारीख १० जून असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

3 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

4 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

4 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

4 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

6 तास ago